मुंबई-मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिका फेटाळून लावण्यात याव्यात अशी विनंती राज्य शासनाने कोर्टासमोर केली आहे. यासाठी शासनाने ४९ पानांचे प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर सादर केले आहे.
कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे मराठा आरक्षणविरोधी याचिका फेटाळण्याची मागणी राज्य शासनाने केली आहे. यामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी याचिकाकर्त्यांची सादर केलेली आकडेवारी निराधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या आरक्षणासाठी सखोल संशोधन करुन मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्याचेही यात म्हटले आहे.