सरकारने आता ‘काम की बात’ करावी – खा. अशोक चव्हाण यांचा टोला

0

शिंदखेडा, नंदुरबारात प्रचार सभा
शिंदखेडा -‘अच्छे दिन’चे स्वप्न जनतेला दाखवून केंद्र व राज्यात सत्ता मिळविणारे भाजपा सरकार गेल्या तीन वर्षाच्या काळात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारने आता काम की बात करावी, असा टोला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे लगावला. खा. चव्हाण यांच्या आज शिंदेखेडा व नंदुरबारात प्रचार सभा झाल्या. या सभामध्ये त्यांनी सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले.
*****
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्या – खा. चव्हाण
सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, जनता, व्यापारी हे त्रस्त झालेले आहेत. भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही. त्यामुळे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केले. शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीनिमित्त काँग्रेसची प्रचार सभा शुक्रवारी शहरातील गांधी चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते.