धुळे । देशात गोरक्षाच्या नावानी सर्वत्र हैदोस चालला आहे. कोण काय खावे काय खाऊ नये हा प्रश्न वैयक्तिक आहे. सरकारने खाण्या पिण्याचा सल्ला जनतेला देऊ नये. हे सरकार आपले सर्व स्तरावरील अपयश लपवण्यासाठी ढोंग करित असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धुळे येथे केला.
नुसते जीआर…?
शेतकर्यांना कर्जमाफी करून दिली म्हणजे काही उपकार केले नाही. सव्वातीन वर्षांपासून नुसत्याच घोषणा, कृती मात्र शून्य, अग्रीम देण्याची मोठी घोषणा करतात, अग्रीम रक्कम दिली त्याची यादी द्या. सहकारविभाग ताब्यात असूनही कर्जमाफीचा याद्या का जाहीर करत नाही. जनता अस्वस्थ असल्याचे सांगत शासनाने कर्जमाफीची यादी जाहीर करावी, असे आव्हान त्यानी दिले.