धुळे । राज्यातील शेतकर्यांच्या आंदोलनातून भाजप सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे, आकड्यांच्या खेळात केलेली शेतकर्यांची निव्वळ फसवणुक केली आहे. 34 हजार कोटीची कर्जमाफी केलेले सरकार सागत असले तरी अनेक नियम अटी शर्यती लावून लावून फक्त नऊ – दहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन शेतकर्यांची बोळवण केली असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रणेते तथा खा. राजू शेट्टी यांनी किसान मुक्ती यात्रेच्या धुळ्यात पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात केली. 7 जुलै पासून खा.राजू शेट्टी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मध्यप्रदेश राज्यातल्या मंदसौर येथून सुरू झालेली किसान मुक्ती यात्रा आज धुळ्यात दाखल झाली. दरम्यान ही किसान यात्रा दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळ्यात येऊन पोहचली. यावेळी शहरातल्या हिरे भवनात शेकडो शेतकर्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला.
शरद जोशींचा मीच खरा वारसदार…
पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही सर्व संघटनांचे नेते दोन मुद्यावर एकत्र आलो आहोत. शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजेत आणी शेतीमालाला दिडपट हमीभाव मिळाला पाहिजे शरद जोशीचा मी खरा वारसदार असल्याचा दावाही त्यांनी केला. 12 जुलैला दिल्लीत होणारे आंदोलनात सहभागी होण्याच्या आवाहन त्यानी उपस्थित शेतकर्यांना केल. देशाचे पंतप्रधान विदेशवार्या करून सध्या अनिवासी भारतीय झाले आहेत त्यामुळे शेतकर्यांकडे बघायला देखील सध्या त्यांना वेळ नाही अशी जोरदार टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली. योगेंद्र यादव, समन्वयक व्ही.एन.सिंग, डॉ.सुनीलम, सुशीला मोराळ, प्रतिभा शिंदे, रोहिदास पाटील, आ.कुणाल पाटील, शरद पाटील, शाम सनेर आदीं उपस्थित होते.