नागपूर । शेतकर्यांचे विविध प्रश्न घेऊन आम्ही राज्यभरातून हल्लाबोल यात्रा काढली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही सभागृहात शेतकर्यांचे प्रश्न लावून धरले, मात्र या सरकारने शेतकर्यांसाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलता उलट त्यांच्या तोडाला पानेच पुसली आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिममंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवन परिसरात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही हल्लाबोल, संघर्षयात्रा अशा अनेक माध्यमांतून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. सभागृहात पहिल्या दिवसापासून शेतकर्यांसाठी न्याय मागितला; पण सरतेशेवटी सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पानेच पुसली, असे पवार यावेळी म्हणाले.