सरकारबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्यानेच मोदी मला लक्ष करतात: शरद पवार

0

कोल्हापूर : काश्मीर हे अतिसंवेदनशील राज्य आहे. तिथला निर्णय घेत असताना तिथल्या लोकांच्या विचार करून घेण्याची गरज होती. पण नरेंद्र मोदींनी ते केले नाही. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे लोक नाराज आहेत. ती नाराजी लपविण्यासाठी मोदी अशा प्रकारचे आरोप करत असल्याचा पलटवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

दर दोन तीन दिवसांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन फक्त आपल्यावर टीका करत असल्याचेही पवार म्हणाले. यावेळी पवारांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मेहबुबा मुफ्ती आणि काही विधानाचा आधार घेवून मोदी टीका करत होते. मेहबुबा मुख्यमंत्री असताना भाजपाचे नेते हे मंत्री होते पण मोदी हे माझ्याकडून उत्तर मागतात असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला.

राफेल बाबत मोदी सरकारकडून प्रत्येकवेळी वेगवेगळी माहिती देण्यात आली. संरक्षण राज्य मंत्री भाबरे यांनी यांनीच राफेलची किंमत वेगळी असल्याच सांगितले. राजीव गांधी यांनी बोफर्स बद्दल चौकशी समिती नेमली होती.त्यावेळी विरोधकांची मागणी मान्य करण्यात आली. मग आत्ता का चौकशी समिती का नेमली जात नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शब्दाला मान होता. पण आजचे नेते हवामान बदलेल तस विधान बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांना काल पर्यंत कळत होत पण आज त्यांना कळत नाही असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. प्रत्येक सभेमध्ये मोदी यांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केले आहे. जे प्रेम व्यक्त केले आहे, त्यावरून आमच चांगल सुरू आहे असे मी समजतो असे शरद पवारांनी म्हटले.