सरकारी कार्यालये सुरू होणार, कर्मचार्‍यांसाठी नियमावली जाहीर

0

मुंबई : देशव्यापी ‘लॉकडाऊन’चा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपल्यानंतर अनलॉक-१ अंतर्गत ‘कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे दैनंदिन व्यवहार पुन्हा केव्हा व कसे टप्प्याटप्प्याने सुरू करावेत, याची नियमावली केंद्र सरकराने प्रसिद्ध केली आहे. यात अटीशर्थींसह राज्यातील शासकीय कार्यालय टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी आरोग्य खात्याने नियमावली जाहीर केली आहे.

कार्यालयासाठी नियम

१) सर्व कर्मचार्‍यांनी तीन पदरी असलेल्या मास्कचा वापर करणे बंधनकारक
२) कार्यालयात कामानिमित्त जाणार्‍या व्यक्तीस मास्क वापरणे बंधनकारक
३) कार्यालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था आवश्यक
४) कार्यालयात येणार्‍या प्रत्येकाचे थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक
५) कार्यालयात दोन कर्मचार्‍यांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राखणे बंधनकारक
६) लिफ्ट, बेल, बटन, टेबल-खुर्ची आणि इतर उपकरणे दिवसातून तीन वेळा २ टक्के सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छ करणे बंधनकारक
७) कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा अल्कोहल मिश्रीत सॅनिटायझरने पुसून घ्यावे
८) कार्यालय साबण व पाण्याने धुवून घेणे
९) एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करू नये
१०) मिटींग्ज शक्यतो व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून घ्याव्यात प्रत्यक्ष घेण्याचे टाळावे.
११) सदर काळामध्ये ऑफिसमध्ये बसून एकत्र डबा खाणे, किंवा एकत्र जमा होणे टाळावे.