‘सरकारी योजनांसाठी आता आधार कार्ड सक्तीचे नाही’

0

नवी दिल्ली । मोदी सरकारने सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकार आधार कार्ड सक्तीचे करू शकत नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आधार कार्डला आव्हान देण्यासाठी 7 न्यायाधीशांचे खंडपीठ बनवले गेलं पाहिजे. सध्या तरी ते शक्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत म्हटलं आहे. आधार कार्डच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जे. एस. खेहर म्हणाले, सरकारी पेन्शन आणि इतर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी सरकार आधारची सक्ती करू शकत नाही.