जळगाव । जलसंधारणाचा उत्कृष्ट उपाय असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना. योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेततळे तयार करण्याच्या उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रशासनाने जिल्ह्यात दोन हजार शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. उद्दिष्ट पुर्ततेकडे वाटचाल सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात 876 शेततळ्यांची कामे पुर्ण झाली आहे. उर्वरित शेततळ्यांचे कामे प्रगतीपथावर आहेत. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले. यात कृषि उपविभागात 470, अमळनेर उपविभागात 790, पाचोरा उपविभागात 740 असे एकूण 2 हजार शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यात 130 पैकी 52, भुसावळ 65 पैकी 26, बोदवड 60 पैकी 16, यावल 100 पैकी 21, रावेर 35 पैकी 23, मुक्ताईनगर 80 पैकी 38, अमळनेर 450 पैकी 213, चोपडा 40 पैकी 25, एरंडोल 70 पैकी 43, धरणगाव 60 पैकी 7, पारोळा 170 पैकी 92, चाळीसगाव 285 पैकी 91, जामनेर 300 पैकी 155, पाचोरा 115 पैकी 60, भडगाव 40 पैकी 14 शेततळ्यांचे कामे पुर्ण झाले आहेत. 4 कोटी 29 लाख 33 हजार रुपये इतका निधी खर्चण्यात आला. शेततळ्यांच्या माध्यमांतून 1 हजार 242.77 टी.सी.एम साठवण क्षमता निर्माण होणार आहे. योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी शेतकर्यांनी कृषि अधिकार्याकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.