पाथरी: भाजपतर्फे राज्यभरात महाजानादेश यात्रा काढली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. दरम्यान आज परभणी जिल्ह्यातील पथरी येथे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सभा सुरु आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात सर्वाधिक विहिरी, सर्वाधिक शेततळी आमच्या सरकारने दिल्याचा दावा करतात, मात्र विहिरी, शेततळी सामान्य जनतेला मिळाली नसून भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याचे आरोप धनंजय मुंडे यांनी केले. राज्य शासनाची योजना सामान्य जनतेसाठी नसून भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री राज्यभरात महाजानादेश यात्रेनिमित्त राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा करत आहेत. महाजानादेश यात्रा ही चालू मुख्यमंत्र्याची चालू यात्रा असल्याचे आरोप धनंजय मुंडे यांनी केले.