सरकारी वकील विद्या पाटील खूनप्रकरणी मुलाने वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष ठरली महत्त्वपूर्ण

जळगाव- सरकारी वकील असलेल्या पत्नीचा उशीने तोंड आणि गळा दाबून खून करणार्‍या पतीला जन्मठेप,  तर सासर्‍याला चार वषार्ंची सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने गुरुवारी सुनावली. या खटल्यात काही  नातेवाईकांसह 17 वर्षीय मुलाने वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरली.
जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील विद्या राजपूत ऊर्फ राखी पाटील (वय 35, रा.सुपारीबाग, जामनेर)  यांचा 13 जानेवारी 2019 रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला. या गुन्ह्यात मृत वकील महिलेचा पती डा ॅ.भरत लालसिंग पाटील (वय 42 रा. जामनेर) व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (वय 74, रा. बेलखेड, ता.  भुसावळ) यांना पोलिसांनी अनुक्रमे 14 जानेवारी 2019 रोजी व 28 जानेवारी 2019 रोजी अटक केली.
परस्पर हलविला मृतदेह—–
अ‍ॅड.विद्या पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्यांचे पती व सासर्‍याने जामनेर येथून भुसावळ येथील  दवाखान्यात नेले होते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कारण सांगितले. वेगवेगळ्या दवाखान्यातील डॉक्टर व  कंपोउंडेर यांनी अ‍ॅड.विद्या पाटील यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. डॉ.राजेश मानवतकर यांनी अ‍ॅड. विद्या  पाटील यांचे शवविच्छेदन करावे लागेल, असेही सांगितले होते. मात्र, पिता-पूत्र  मृतदेह परस्पर बेलखेडे  (ता.भुसावळ) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी घेवून गेले. त्या ठिकाणी अ‍ॅड.विद्या पाटील यांचा मावस  भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळुंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले. तर हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे  पतीने सांगितले होते. परंतु, नातेवाईकांनी अ‍ॅड.पाटील यांचा चेहरा बघितला असता त्यांना संशय आला. त्यांना  शरीरावर जखमा दिसल्या. अ‍ॅड.पाटील यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची  मागणी केली. या मागणीला पतीने विरोध केला.
जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल—-
यासंदर्भात काही नातेवाईकांनी वरणगाव पोलिसांना कळविली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन ते  मृतदेह वरणगाव येथील रुग्णालयात घेवून गेले. तेथे पंचनामा करुन मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयात नेण्यात आला. दुसर्‍या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर अ‍ॅड.विद्या पाटील यांचा मृत्यू गुदमरून,  तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार पती डॉ. भरत पाटील व सासरे  लालसिंग पाटील यांच्या विरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
संशयायनम: विनाशाय…..
निकाला देताना न्यायाधीशांनी ‘संशयायनम: विनाशाय’ या संस्कृतमधील श्‍लोकाचा उल्लेख केला. संशय आला  की विनाश होतो, असे डॉ.भरत पाटील यांना सुनावले. अ‍ॅड.विद्या पाटील यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत  संशय घेतला जात होता. त्या सतत मोबाइलवर बोलत होत्या. त्यामुळे संशय बळावत होता, असे जिल्हा सरक ारी वकील केतन ढाके यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून पती कारागृहात होता.  तर सासरा जामिनावर होता. निकालानंतर न्यायालयाने दोघांना अटक करण्याचे आदेश दिले.
14 साक्षीदारांच्या साक्ष ठरल्या महत्त्वूपूर्ण……
या खटल्यात एकूण 19 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. त्यापैकी 14 साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वूपूर्ण  ठरल्या. यात फिर्यादी गणेश सुरळकर, ज्या डॉक्टरांकडे अ‍ॅड.पाटील यांना उपचारासाठी नेण्यात आले होते, ते  डॉ.राहुल जावळे, डॉ.राजेश मानवतकर, चुलतभाऊ सूरज सरदारसिंग पाटील, वाहन चालक विपुल गोपाल  पटेल, मुलगा दुर्वेश ऊर्फ सोनू भरत पाटील, बहिण प्रिया प्रमोद साळुंखे, शासकीय वैद्यकीय अधिकारी डा ॅ.स्वप्निल चंद्रकांत कळसकर, वरणगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी सारिका कोडापे, जामनेर  शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा, जळगाव न्यायालयातील सरकारी वकील सुप्रिया  सुरेश क्षीरसागर, जामानेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, शवविच्छेदन करणारे डॉ.नीलेश देवराज,  जामनेर येथील अ‍ॅड.ज्ञानेश्‍वर बाबुराव बोरसे आदींच्या साक्ष व मोबाइल सीडीआर आणि फॉरेन्सिक अहवाल  महत्त्वपूर्ण ठरला.