मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडी मिळून सरकार स्थापन केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार किती दिवस चालेल याबाबत विरोधी पक्षाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी मात्र हे सरकार ५ वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार ५ वर्ष सरकार चालेल, सरकारचं नेतृत्व करण्याची व्यक्ती कशी आहे तिचा स्वभाव कसा यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सध्या ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया, ज्यांना जे काम दिलं आहे ते त्यांनी करावं, त्यात हस्तक्षेप करत नाही, हे सरकार संमिश्र आहे त्यामुळे किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.
त्याचसोबत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काय फरक आहे असं विचारल्यानंतर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या निर्णयासाठी दिल्लीला जावं लागतं, केंद्रीय सत्ता आणि नेतृत्वाची विकेंद्रीकरण असल्याने अनेकदा अडचण येते. काँग्रेसने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत बदल केल्याचं दिसून येतं. हे सरकार चालवायचं ही भूमिका काँग्रेसने घेतल्याचं दिसतं, आता उद्धव ठाकरे आमच्यात रमले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.