सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील

0

मुंबई : सरकार वारंवार पुरवणी मागण्या मांडून जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. आजही सरकारने २० हजार कोटींच्यावर पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यापूर्वी मांडलेल्या पुरवणी मागण्यांचा विनियोगही सरकारने केला नाही. त्यातच पुन्हा पुरवणी मागण्या मांडल्या जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले. सरकारने आधीच अनेक विभागांच्या खर्चाला कात्री लावली आहे. सरकारने आतापर्यंत मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांचा खर्चही सभागृहात मांडावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

युती सरकारच्या काळात विक्रमी पुरवणी मागण्या

दरम्यान युतीच्या चार वर्षाच्या काळात विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्याने राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आतापर्यंत या सरकारने १३ अधिवेशनात मिळून १ लाख ६७ हजार ४४५ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.