नवी दिल्ली: देशात गेल्या 17 दिवसांपासून सलग पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात असलेल्यांना इंधन दरवाढ झाल्याने अधिकच आर्थिक भार सोसावा लागतो आहे. दरम्यान देशातील वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, यात सोनिया गांधी यांनी इंधन दरवाढीवरून सरकारवर टीका केली. सरकार जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचे आरोप सोनिया गांधी यांनी केले आहे. कोरोनच्या काळात सरकारने पुरेसे आर्थिक पॅकेज जाहीर केले नाही असे आरोपही सोनिया गांधी यांनी केले आहे.