सरकार बेस्ट संपावर तोडगा काढत नसल्याने मनसेने मेट्रोचे काम बंद पाडले !

0

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाला आठवडा पूर्ण होत आला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे. सत्ताधाऱ्यांकडून कोणताही उपाय शोधण्यात येत नसल्याने मनसेने या वादात उडी घेतली आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गिरगावातील मेट्रो -3चे कामकाज बंद पाडले. मनसैनिकांनी यावेळेस मेट्रोच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणाहून बाहेर काढले. ”सरकारने आधी बेस्टच्या संपावर तोडगा काढावा, त्यानंतर मेट्रोचे काम सुरू करावं”, असे म्हणत मनसैनिकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.