नेवासा : महाराष्ट्रात 36 हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतरही अजूनही कर्जमाफीची चर्चा होत आहे. या कर्जमाफीसाठी भरून घेण्यात येणार्या अर्जाचा नमुना पाहिल्यानंतर हे सरकार घरामध्ये भांडणे लावण्याचे उद्योग करीत असल्याची टीका खा. पवार यांनी केली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. पवार यांचा नगर जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच, माजी आमदार पांडुरंग अभंग याचा अमृत महोत्सव सोहळा खा. पवार यांच्या उपस्थितीत झाला; त्यावेळी खा. पवार बोलत होते.