सरकार भाजपचे आहे युतीचे नाही; मंत्री दिवाकर रावते यांची उघड नाराजी

0

मुंबई-राज्यात भाजप-सेनेचे युती सरकार असून देखील दोन्ही पक्षातील तणाव अनेक वेळा चव्हाट्यावर आले आहे. शिवसेना नेहमीच सत्तेत सहभागी असतांना देखील सरकारवर आरोप करीत असते. दरम्यान शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हे सरकार युतीचे नसून भाजपचे आहे अशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. रावते यांच्या उघड नाराजीमुळे पुन्हा एकदा शिवसेनेची उघड भूमिका समोर आली आहे.