सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले, मंत्र्यांनीही लाजा सोडल्या!

0

शिरुर । राज्य सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले असून मंत्र्यांनीही लाजा सोडल्या आहेत. 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले, 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार यांनी केला. याची न्यायालयानी चौकशी होण्याची गरज आहे. राज्य सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले असून मंत्र्यांनीही लाजा सोडल्या आहेत. 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले, 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार यांनी केला. याची न्यायालयानी चौकशी व्हावी अशी मागणी करत भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला आव्हान दिले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे हल्लाबोल यात्रेत मुंडे बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना धनंजय मुंडे म्हणाले, भाजपाच्या महामेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राष्ट्रवादीची दहशत तुम्ही पाहिली असेल. ज्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना पाणी प्यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांच्या वयाचे भान तरी ठेवायला हवे होते. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशात नवे प्रश्‍न उपस्थित करत आहे. मूलभूत प्रश्‍नांना बगल देत भलत्याच चर्चा रंगवत आहे. या सरकारला घरी बसवल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही.

भ्रष्टाचाराची चौकशी करा
मुंडे म्हणाले, सरकारमधील मंत्र्यांनीही लाजा सोडलेल्या आहेत. 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. त्याची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी करत हे आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या, असे आव्हान मुंडे यांनी सत्ताधार्‍यांना दिले. याच हल्लाबोल यात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपावर टीका केली. जेव्हा शेतकर्‍यांचे प्रश्‍न उभे राहतात, तेव्हा शरद पवारच धावून येतात. डिजिटल इंडिया झालाच पाहिजे पण केवळ त्याने पोट भरत नाही ते काम फक्त शेतकरीच करू शकतो, असे खासदार सुळे म्हणाल्या.