पिंपरी-चिंचवड-देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती साजरी करण्यात आली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त डॉ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट (एनवायके), युवा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय संलग्नित संस्थेतर्फे सरदार पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार, मणिरत्न शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सेवावृत्ती, निस्वार्थपणे समाज सेवा करणाऱ्यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार, ११० शिक्षकांना मणिरत्न शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दैनिक जनशक्तीचे संपादक तसेच उद्योजक कुंदन ढाके, उद्योजक डॉ.मीलिंद चौधरी यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे होते.