सरदार पटेल महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात

0

निंभोरा । सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात 1 मार्च ते 8 मार्च महिला दिन साप्ताह साजरा करण्यात आला. ऐनपूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि युवती सभा अंतर्गत प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला दिन साप्ताहत भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. त्यात वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यान, सुप्तकला गुण सादरीकरण यांचा समावेश होता. महिला लैगिक शोषण-एक ज्वलंत समस्या हा विषय वक्तृत्व स्पर्धेचा होता.

स्त्रियांनी करीअर करण्यासाठी शिक्षण घ्यावे
प्रा. व्ही.एच. पाटील, प्रा.एम.के. सोनवणे, प्रा.एन.यु. बारी, प्रा.उमरीवाड, डॉ.रेखा पाटील, डॉ.नीता वाणी, प्रा.दिलीप सोनवणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी कथन केली. प्राचीन काळ ते आजतागायतच्या कर्तृत्ववानमहिलांचे उदाहरण त्यांनी सादर केले. प्रसार माध्यमे आणि समाज- विपरीत परीणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्त्रियांनी मर्यादेत राहून प्रगती साधावी, स्त्रिया दोन कुलांचा उद्धार करतात. स्त्रियांनी वेटींग रूम म्हणून शिक्षण घेऊ नये तर करीयर करण्यासाठी शिक्षण घ्यावे. अनादिकालापासुंचा सासू सून झगडा संपला पाहिजे. सासुत आई लपलेली असते त्या आईला शोधा. जीवन जगत असताना कुणावर अन्याय करू नका आणि अन्याय सहन करू नका. स्वाभिमानाने जगा. स्त्री पुरुष समानता खरोखरच आहे का? या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रेखा पाटील या होत्या.

सूत्रसंचालन वैशाली भवरे हिने केले. आभार दुर्गा कोळी हिने मानले. विशेष सहकार्य पूजा भागिले, रीना दागोडे, योगेश पाटील, दीपक पाटील, आनद कोळी, सीमा भवरे, माधुरी जैतकर, अर्चना महाले, प्रा.वंदना राणे, डॉ.रेखा पाटील यांनी केले. डॉ.नीता वाणी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली केले.