बारामती : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती बारामती तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याचे औचित्य साधून तहसिल कार्यालयाच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय भवन ते एस.टी.स्टॅण्ड या मार्गावर ही एकता दौड घेण्यात आली. यावेळी तहसिलदार हनुमंत पाटील, व्ही. एस. ओहोळ, नायब तहसिलदार भोसले, पांढरपट्टे, कोळेकर, गजानन हतेडीकर तसेच तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय कर्मचार्यांनी घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार हनुमंत पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. भारताचे पहिले गृहमंत्री व स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व उपस्थितांना राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.