सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त भुसावळात जंगी मिरवणूक !

0

भुसावळ: भुसावळ शहरातील शांतीनगर परिसरातून लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शांतीनगर उत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत शहरातील दिग्गजांनी सहभाग घेतला.

भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धिविनायक गृपचे चेअरमन कुंदन ढाके, नगरसेवक प्रमोद नेमाडे, उत्सव समितीचे अध्यक्ष मयूर चौधरी, उपाध्यक्ष शुभम महाजन, यतीन ढाके, सामाजिक कार्यकर्ते गिरीश महाजन, वैभव भारंबे, हर्षल पाटील, प्रशांत पाटील, प्रशांत ढाके, सागर जावळे, पंकज चौधरी, रितेश भारंबे, रितेश कोल्हे, मिलिंद कोल्हे, इंद्रजीत चौधरी आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी दिग्गजांनी ढोलताशांच्या तालावर ठेका धरला. मिरवणुकीसाठी पाळधी येथील श्रीराम गृपचे ढोलताशा पथक होते.