अहमदाबाद:गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे निवेदन सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केली आहे.
मुख्यमंत्री विजय रूपानी आणि उपमु ख्यमंत्री नितीन पटेल यांनी हा पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच भेट दिली. या परिसराला ‘एकता की प्रतिमा’ असे नाव देण्यात आले आहे. सरदार सरोवर धरणापासून एक किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवरील एक लहान साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे.
अंतर्गत स्टील व ब्राँझचे काम १० सप्टेंबर आणि २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. तर, पूर्ण पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. पुतळा उभारणीसाठी १९८९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ‘स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी देशाला एकसंध ठेवण्याचे अवघड काम केले आहे.