भिवंडी : भिवंडी-ठाणे रस्त्यावरील कशेळी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या निकिता भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या सरपंच कुंदा तरे यांचा कार्यकाळ संपताच सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. ग्रामविस्तार अधिकारी आर.बी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवडणूक पार पडली.