शिक्रापूर : येथील सरपंच अंजना गोविंद भुजबळ यांनी त्यांच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या गावचे सदस्य पर्यटनाला गेले असल्याचे बोलले जात आहे.
शिक्रापूरच्या सरपंच अंजना भुजबळ यांनी राजीनामा देताच काही ग्रामपंचायत सदस्य दक्षिण भारताच्या पर्यटनस्थळी गेले आहेत. शिरूर तालुक्यातील सर्वांत मोठी व संवेदनशील ग्रामपंचायत म्हणजे शिक्रापूर ग्रामपंचायत असून सत्ताधारी गटाच्या तडजोडीमुळे अंजना भुजबळ यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे व पुढील काळातील सरपंच म्हणून सुजाता खैरे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अतिशय अटीतटीची ही निवडणूक झाली होती. यावेळी दोन्ही गटांचे आठ आठ सदस्य तर एक अपक्ष सदस्य असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणूकीकडे लागले होते.
यावेळी विरोधी गटाने अपक्ष उमेदवारास पळवून नेले होते. परंतु सध्याच्या सत्ताधारी गटाने यांचेकडे आठ सदस्य असताना देखील त्यांचा एक सदस्य फोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले व ऐनवेळी अंजना भुजबळ यांची सरपंचपदी निवड झाली होती. तर आता अंजना भुजबळ यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सर्वांचे लक्ष सध्याच्या राजकीय विषयाकडे लागले आहे. सध्या या गटाकडे नऊ सदस्य असल्यामुळे सर्व सदस्य पर्यटनस्थळी गेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा याच गटाचा सदस्य सरपंच होईन अशी स्थिती असून ऐनवेळी काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.