सरपंचावरील अविश्वास ठराव फिसकटण्याच्या मार्गावर

0

अडावद। येथील ग्रामपंचायत सरपंच भारती सचीन महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी 3 जुलै रोजी अडावद ग्रामपंचायत मधील 14 सदस्यांपैकी 10 सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस चोपडा तहसीलदार यांना दिली होती. तहसीलदार यांनी 7 जुलै रोजी सभा आयोजित करण्याची नोटीस दिली आहे. त्यावरून 7 रोजी अविश्वास ठराव पारीत करण्यासाठी 14 मधून 11 सदस्य लागतील असे माहीत पडल्यावर एक सदस्यची मनधरणी रात्रीच्या 1 वाजेपर्यंत सुरू होती. आणि 14 मधून 3महिला सदस्य आहेत. या 3 मधून आधी मला सरपंच करा या करणावरून मनधरणी फिस्कटल्याचे समजत आहे. 10 सदस्यांपैकी काही सदस्यही 7 रोजी गैरहजर राहण्याच्या तयारीत दिसत आहे. आजच्या बैठकीत काहीही नाट्यमय घडू शकते करण राजकारणात उद्याचा शत्रू आज मित्र होऊ शकतो आणि आजचा मित्र उद्या शत्रू होउ शकतो म्हणून राजकारणात कधीही काहीही घडू शकते. म्हणून आज होणार्‍या सभेवर पूर्ण अडावदकरांचे लक्ष लागले आहे.

गो.से. हायस्कुलतर्फे विठ्ठल रूख्मीनींचा पेहराव
श्री. गो.से. हायस्कुल येथुन विठ्ठल रुखमाईचे पालखी पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी – विद्यार्थीनींनी विठ्ठल रुख्मीनींचा पेहराव करुन शहरात मिरवणुक काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पध्दतीने रिंगण करुन विठ्ठल नामाची गिते, भजने गायली. टाळ व मृदृंग यांच्या संगतिने विठ्ठल -रुखमाईच्या जयघोषाने संपुर्ण परिसर भक्तीमय सागरात मंत्रमुग्ध झाला होता. दिंडीच्या समारोप प्रसंगी पाचोरा पिपल्स बँकेचे चेअरमन व संचालक यांनी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आषाढीनिमित्त एरंडोलला कार्यक्रम
एरंडोल । येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर व गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते पालखी पूजन करण्यात आले. शालेय समितीचे सचिव सचिन विसपुते अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थ्यांची शालेय दिंडी काढण्यात आली. अमळनेर दरवाजापासून दिंडीची सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी नेण्यात आली. दिंडीत सहभागी झालेले विविध पोशाखातील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण, मुख्याध्यापिका माधुरी तायडे यांचेसह सर्व शिक्षक उपस्थित होते. पालखी पाहण्यासाठी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.