सरपंचावर अविश्वास मंजूर

0

चाळीसगाव। तालुक्यातील बोरखडे बु॥ (पिराचे) येथील सरपंच सुशीला आण्णा कांबळे यांचेवर 7 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला होता. त्यविरोधात सरपंचांनी उच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन स्थगिती मिळवली होती. नंतर उच्च न्यायालयाने देखील ती स्थगिती उठवली तदनंतर सर्वोच्च न्यायालयाने मागणी फेटाळली. सदस्यांना विश्वासात न घेणे, ग्रामस्थांवर खोट्या तक्रारी दाखल करणे या कारणास्तव मा. तहसीलदार यांनी गुरुवारी 24 रोजी बोलावलेल्या विशेष सभेत 7 विरोधात 0 अशा संख्येने ठराव मंजूर झाला. सभेत तहसीलदार कैलास देवरे व कर्मचारी स्टाफ, ग्रामसेवक हजर होते. पोलिस स्टेशन मेहुनबारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सरपंच अपात्र झाल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. नवीन सरपंचाची नियुक्ती होत नाही तोपर्यत उपसरपंच हे सरपंच पदाचा कारभार पाहणार आहे.