सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर

0

जळगाव: ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र सरपंच व उपसरपंच निवड बाकी आहे. सगळ्यांच्या नजरा सरपंच, उपसरपंच निवडीकडे लागले आहे. दरम्यान सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सरपंच निवडीचा कर्यक्रम जाहीर केला आहे. १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान सभा घेऊन सरपंच आणि उपसरपंचांची निवड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहे.