उपसरपंचपदी संतोष दांगट यांची बिनविरोध निवड
नारायणगाव । नारायण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचदी सरपंच योगेश नामदेव पाटे यांचे जवळचे सहकारी आणि मित्र संतोष मुरलीधर दांगट यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनियुक्त सरपंच तसेच सदस्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यावेळी ही निवडणूक प्रख्रीया पार पडली. निडणूक निर्णय अधिकारी म्हणून किसन मोरे यांनी काम पाहिले. सर्वात आधी गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच लहानपणापासूनच मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणन जि. प. शाळेच्या अंगणवाड्यांना खेळणी वाटप करणार असल्याचे नवनियुक्त सरपंच पोटे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या आधीच्या सदस्यांचा कार्यकाल 22 फेब्रुवारीला संपल्यामुळे नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतच्या कार्यालयाचे तसेच इमारतीचे नूतनीकरण करून पदभार स्विकारला आहे. यावेळी गटनेत्या आशा बुचके, संतोषनाना खैरे, बाळासाहेब पाटे, विकास तोडकरी, आशिष माळवदकर, आरिफ महमंद सलिम आतार, ज्योती दिवटे, रुपाली जाधव, अश्विनी गभाले उर्फ अश्विनी ताजणे, अनिता कसाबे, सारिका डेरे, विजय वाव्हळ, राजेश बाप्ते, सुप्रिया वाजगे उर्फ खैरे, कुसुम शिरसाठ, पुष्पा आहेर आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलतात्या दिवटे यांनी तर प्रास्ताविक व आभार आशिष माळवदकर यांनी मानले.