जळगाव । शेतकर्यांचा कैवार लक्षात घेता बिकट परिस्थितीचे सरकारला गांभिर्य नसून देशाचा आर्थिक कणा असणार्या शेतकर्याच्या पाठीत सरकारने खंजीर खुपसला आहे.
सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचा लढा सुरुच राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदिपभैय्या पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.