पाचोरा । राज्यात शेतकरी व सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठीच स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली असून भाजपासोबत सत्तेत राहून राज्यकर्त्यांना जागे ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेने सरकारच्या कानाखाली वाजविल्यानेच सरकार कर्जमाफीपर्यंत येवून पोहचले आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी देवून सात बारा कोरा होत नाही तो पर्यंत शिवसेना संघर्ष सुरुच ठेवेल.
अन्यथा 25 जुलैला मोठ्या राजकीय भूकंपाला सरकारला सामोरे जावेच लागेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाचोरा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात केले. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, माजी आमदार आर.ओ.पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, महानंदा पाटील आदी उपस्थित होते. शिवसेना कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकर्यांच्या पाठीमागे उभी राहिलेल्यानेच सत्ताधारी भाजपा सरकारने अल्पभूधारक शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, तत्वत: शब्द हे मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचीच भाषा आहे. 25 जुलै रोजी विधानभवनावर सुमारे 10 ते 15 लाख शेतकर्यांसह शिवसेना धडक देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, रावसाहेब पाटील, डॉ.भरत पाटील, अरुण पाटील, दिपकसिंग राजपूत, पद्मसिंग पाटील, विकास पाटील, दिपक पाटील, संजय पाटील, मुकुंदा बिल्दीकर, अॅड.दिनकर देवरे, अॅड.राजेंद्र परदेशी, किशोर बारावकर आदी उपस्थित होते.