एरंडोल। तालुक्यातील विखरण येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्याना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, मुख्याध्यापक बी.वाय.पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना शालेय पुस्तके वाटप करून व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित शाळेत येवून अभ्यास करावा असे आवाहन केले.
उपस्थित मान्यरांकडून उपक्रमाचे कौतूक
मुख्याध्यापक बी.वाय.पाटील यांनी शाळेच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या उपक्रमांबद्दल तसेच शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास जी.के.अहिरराव, डी.एस.पाटील, टी.बी.महाजन, एम.एन.अहिरे, एस.वाय.देशमुख, सुषमा पाटील, एम.जी.गजरे, रेणुका पाटील, ए.इम्पातील, एन.डी.भावसार, एस.डी.मराठे यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.