भुसावळ : शहरातील सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे (प.क.कोटेचा महिला महाविद्यालय) सचिव संजय सुरेशचंद्र सुराणा यांना राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक यांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भालोद येथिल सामाजिक कार्यकर्ते कुंदन धर्मा तायडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत संस्था संचलित श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या संदर्भात रीतसर अर्ज करीत माहिती मागविली होती परंतु जनमाहिती अधिकारी यांनी चक्क आम्हास माहिती अधिकार कायदा लागुच नाही, अशी भूमिका घेवुन माहिती देण्याचे नाकारले होते. याप्रश्नी कुंदन तायडे यांनी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करुन दाद मागितली होती. आयोगाने शैक्षणिक संस्था ही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत असून माहिती देणे बंधनकारक आहे, असे नमुद करुन माहिती देण्यात टाळाटाळ केली म्हणऊन पाच हजाराचा दंड ठोठावला आहे.
न्यायप्रविष्ठ बाब : संजय सुराणा
ही बाब अद्याप न्यायप्रविष्ठ असून याबाबबत अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे संजय सुराणा म्हणाले. या संदर्भात अपिल दाखल करण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.