सराईताकडून 24 लाखांचा माल जप्त

0

पुणे । सिंहगड रोड परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोड्याच्या प्रमाणात मोठी वाढ झोली होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सिंहगड रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पायी चालत येऊन घरफोड्या करणार्‍यास जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 789 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख 25 हजार रुपये असा 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 23 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.सुनील उर्फ सुशील बबन भोसले (27, रा. भीमा कोरेगाव, मूळ अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी हा पेरणे फाटा येथून सिक्स सिटर आणि पीएमटी बसने सिंहगड रोड परिसरात यायचा आणि वॉचमन नसलेल्या सोसायटीत प्रवेश करून पोपट पकड व कटावणीच्या साहाय्याने बंद फ्लॅट फोडायचा. अशाप्रकारे त्याने दिवसाढवळ्या 12 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वीही येरवडा, विश्रांतवाडी, चिंचवड परिसरात घरफोड्या केल्या आहेत. त्यासंदर्भात त्याला 2009 मध्ये कैदही झाला होती.