सराईत गुन्हेगारास चोरीचे दागिने घेणारा सोनार गजाआड

0

कल्याण : कल्याण बाजरपेठ पोलिसांनी एका सराईत चोरट्याला गजाआड करण्यात यश मिळवले असून या प्रकरणी तपासादरम्यान त्याने चोरि केलेले सोने विकत घेणारा सोनाराला हि पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . सॅमसन रुबीन डॅनियल (19) असे या चोरट्याचे नाव असून राजीव उर्फ अमोल प्रदीप सोनी असे या सोनाराचे नाव आहे .

कल्याण डोंबिवली शहरात वाढत्या घरफोडी च्या घटना मुळे नागरिकामध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने पोलीस यंत्रणेसमोर आवाहन उभे ठाकले आहे .या पार्श्वभूमीवर या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस उपयुक्त संजय शिंदे यांनी सर्व पोलीस स्थानकाना सूचना दिल्या होत्या .त्यानुसार पोलीसनी या चोरट्याचा छडा लावण्यासाठी सराईत गुन्हेगारांची यादी काढत त्यांचा शोध घेण्यसाठी जंग जंग पछाडले होते .याच दरम्यान पोलीस रेकोर्ड वरील सराईत गुन्हेगार सॅमसन रुबीन डॅनियल बाबत त्यांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी सॅमसन रुबीन डॅनियल का बेतूरकर पाडा परिसरातून अटक केली .त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने आपण चोरी केलेले सोने काळा तलाव परिसरातील पूजा ज्वेलर्स चा मालक राजीव उर्फ अमोल सोनी याला विकत असल्याची माहिती दिली या महितीनुसार पोलिसांनी या राजीव उर्फ अमोल सोनी या सोनाराला अटक केली .या प्रकरणी सखोल तपास चौकशी करत पोलिसांनी पाच लाख पंचावन्न हजारांचे १९५ ग्राम दागिने जप्त केले . सॅमसन रुबीन डॅनियल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली अटक करण्यात आलेला चोरटा सॅमसन हा सराईत चोर आहे. त्याने अटकेनंतर चार गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. तो पाळत ठेऊन चो:या करायचा. मौजमजा करण्यासाठी सॅमसन हा घरफोडय़ा करीत होता.अटल घरफोड्या करणाऱ्याला जेरबंद केल्याने काही प्रमाणात घरफोड्यांना आळा बसणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे चोरीचा माल घेणाऱ्या सोनारालाही अटक केल्यामुळे सोने-चांदी जवाहिऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.