सराईत गुन्हेगार स्थानबद्ध

0

पुणे । सहकारनगर परिसरातील सराईत गुन्हेगार विशाल उर्फ डोक्या सुदाम साळुंके (30, रा. धनकवडी) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. विशाल उर्फ डोक्या हा 2009पासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे. त्याच्यावर जिवघेणी हत्यारे बाळगणे, जबरी चोरी करणे, पळवून नेणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला दोन वर्षासाठ शहर आणि लगतच्या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीसुद्धा त्याच्या गुन्हेगारी कारवायामध्ये फरक पडला नाही. त्यामुळे 9 ऑगस्टपासून एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध केले.