सराईत मोटारसायकल चोर पोलीसांच्या जाळ्यात

0

चाळीसगाव । मागील 2 महीन्यापुर्वी पत्रकारांची मोटारसायकल चोरी केल्या प्रकरणी तुरूंगाची हवा खावुन आलेला सराईत मोटारसायकल चोराने चक्क पोलीसाचीच मोटारसायकल दिनांक 15 जुन रोजी लांबवली होती. त्यास पोलीसांनी अटक केली असून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार 15 जून रोजी पोलीस नाईक संदीप तहसीलदार यांची मोटारसायकल लांबविल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा पाहताच पोलीसांना त्याची ओळख झाली. बेलदारवाडी ता चाळीसगाव येथील सराईत मोटारसायकलचोर पोपट दगा कुमावत असल्याची खात्री होताच पोलीसांनी त्याचा शोध सुरू केला.

नागद रोडवरून घेतले ताब्यात
नागदरोडवरून मोटारसायकल घेवून जात असतांना त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून चोरीची मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसापुर्वी पोपट दगा कुमावत याने पत्रकार सूर्यकांत कदम यांची मोटारसायकल पोलीस ठाण्याजवळून लांबविली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजवरून त्यास अटक करून मोटारसायकल जप्त करण्यात आली होती. पत्रकाराच्या मोटारसायकलीनंतर पोलीस नाईक संदिप गणेश तहसिलदार या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीसाचीच मोटारसायकल या भामट्याने लांबविली. मात्र पोलीसांच्या सतर्कतेमुळे तो मिळून आला. या प्रकरणी पोलीसात भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी पोपट दगा कुमावत यास 140/2 प्रमाणे अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. मिलींद शिंदे करीत आहेत.