सराईत मोबाईल चोरट्यास अटक

0

जळगाव प्रतिनिधी । पोलिसांनी गुरफान शेख करीम या अट्टल मोबाईल चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, गेंदालाल मिल परिसरातून जाणारा गणेश रवींद्र सोनवणे (वय १८, रा. कांचननगर) या तरुणास ९ एप्रिल रोजी चार चोरट्यांनी अडवले होते. चोरट्यांनी त्याच्याकडील ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल व २ हजार ५०० रुपये रोख असा ऐवज लांबवला होता. या गुन्ह्यात शहर पोलिसांनी गुरफान शेख करीम (वय २२, रा. गेंदालाल मिल) या चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे नऊ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
गुरफान व त्याच्या साथीदारांनी शहरात अनेक ठिकाणी चोर्‍या केल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक आशिष रोही, वासुदेव सोनवणे, बशीर तडवी, संजय शेलार, गणेश शिरसाळे, संजय भालेराव, दीपक सोनवणे, अक्रम शेख, इमरान अली सय्यद, सुधीर साळवे, किरण पाटील, प्रणेश ठाकूर, अमोल विसपुते यांच्या पथकाने काही दिवसांपासून गेंदालाल मिल परिसरात चौकशी सुरू केली होती.