यावल- सराफा लूट प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना यावल न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यात प्रारंभी अटकेतील दोघांना दोन दिवस तर नंतर अटक करण्यात आलेेल्या एकास तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गत शनिवारी रात्री सराफा व्यावसायीक श्रीनिवास नंदकिशोर महालकर यांना चार अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर पिस्तुल रोखले व चाकुने त्यांच्यावर हल्ला चढवत यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटले. यात सुरवातीला आकाश सुरेश सपकाळे व चेतन गंगाधर कोळी (रा.जैनाबाद जळगाव) यांना अटक केली होती. त्यांना 20 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती तर नंतर पोलिसांनी मुख्य संशयीत गौरव कुंवर यास अटक केली होती व त्याची ओळख परेड करून त्याला जळगाव कारागृहात रवाना केले होते. दरम्यान, अटकेतील अन्य तिघांना शनिवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यातील आकाश व चेतन या दोघांना न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत तर गौरव कुंवर यास 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील संशयीतांकडून सुरवातील आठ किलो 738 ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत दोन लाख 74 हजार 126 रुपये) तर नंतर 199 गॅ्रम सोन्याचे दागिने किंमत पाच लाख 98 हजार असा एकूण आठ लाख 72 हजार 126 रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला चाकु जप्त केला आहे तसेच यांनी अशा प्रकारे कुठे लूट केली आहे का? व गुन्ह्यातील पसार संशयीत गोलू उर्फ यश राजेंद्र पाटील यास अटक करण्याकरीता यांना पुन्हा पोलिस कोठडी मिळाली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुजित ठाकरे करीत आहे.