सराफ दुकानात चोरीप्रकरणी जळगावातून रिक्षा चालकास अटक

0
रावेर – ज्वेलर्सच्या दुकानातून 30 ग्रॅम सोन्याची चैन लांबविल्याप्रकरणी लांबविल्या प्रकरणी रावेर पोलिसांनी जळगावातून एका रिक्षा चालकास चालकास ताब्यात घेतला असुन त्याची कसून चौकशी सुरु असुन पोलिस कोठडी मिळाली आहे. तसेच साथ देणारे दोन महिलांचाही तपास सुरु आहे. याबाबत वृत्त असे की, शहरातून भारतीय ज्वेलर्स येथून ११ रोजी तीन अज्ञात चोरट्यांनी 90 हजार रुपये किमतीची 30 ग्रॅम सोन्याची चैन लांबवली लांबवली होती. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून गुप्त माहिती वरुन जळगाव येथून रिक्षा क्र (एमएच १९ व्ही ६५०८) हिच्यासह आरोपी शे.परवेज शे. यूनुस यास जोशी वाडा जळगाव येथून ताब्यात घेतले. तो दोन महिलांसोबत रावेरात येऊन चोरी केली होती. त्याला साथ देणारे दोन महिलांचा देखील शोध सुरु आहे. या गुन्हाचा तपास फौजदार मनोहर जाधव, पोना हरिलाल पाटील, जाकिर पिंजारी, सुरेश मेढे हे करीत आहे