भुसावळ। साकेगाव येथील सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सायन्स एमबीए महाविद्यालयात एकदिवसीय लघुउद्योजकता व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ, सचिव संजय इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर लघुउद्योजकता, तांत्रिक उद्योग आणि जैविक उद्योग या विषयावर प्रा. मो. सादिक शेख यांचे व्याख्यान झाले. याअंतर्गत संचालक डॉ. बी.एन. गुप्ता यांनीदेखील मार्गदर्शन केले. चर्चासत्रानंतर प्रा. निरज चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. तन्विर सैय्यद व प्रा. यशश्री चौधरी यांचे सहकार्य लाभले. या चर्चासत्रात एमबीए प्रथम व द्वितीय वर्षाचे 70 विद्यार्थी उपस्थित होते.