आळंदी-चाकण रस्त्यावर बैलजोडी पाहण्यासाठी गर्दी
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या नवीन पालखी रथाची चाचणी सर्जा राजा बैलजोडी जोडून घेण्यात आली. रथास बैलजोडी देणारे मानकरी रामकृष्ण घुंडरे यांनी ही बैलजोडी आळंदीत आणली. आळंदी चाकण रस्त्यावर ही चाचणी झाली. रथाची तांत्रिक देखभाल दुरुस्ती, ब्रेकला ग्रीसिंग करण्याची गरज असल्याचे यातून समजले. 1 जुलैला आळंदीत सर्जा-राजाची मिरवणूक असल्याचे मानकरी सचिन घुंडरे यांनी सांगितली. बैलांची निवास व्यवस्था घुंडरे पडाळीवर केली आहे. यात पाणी, आरोग्य, स्वच्छता, पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत नियमित तपासणी होत आहे. माउली संस्थानला नवीन रथ भेट देण्यात आला आहे. या नवीन रथाला सर्जा राजा बैल जोडून चाचणी करण्यात आली. नवी बैलजोडी पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. चाचणीवेळी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, पै.शिवाजीराव रानवडे, विठ्ठलराव घुंडरे, रामकृष्ण घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.
Prev Post
Next Post