सर्जिकल स्ट्राइकमुळे घुसखोरी कमी झाली

0

नवी दिल्ली । देशाने उचलललेले सर्जिकल स्ट्राइकचे पाऊल योग्य ठरले. सर्जिकल स्ट्राइक केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले घुसखोरीचे प्रमाण 45 टक्क्यांनी घसरले. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी वेळ लागेल, असे माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. केंद्रात मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. देशाच्या ईशान्य भागात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेली आहेत. उत्तम समन्वयामुळे आयसीसचा धोका कमी करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. देशात मुस्लिमांची संख्या जास्त असूनही आयसीस सारख्या संघटनांना भारतात मजबूत होऊ दिले नाही, असा दावा राजनाथ सिंग यांनी केला आहे. दहशतवाद्यांवरोधात लढण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था उत्तम राखण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. देशाची एकूणच सुरक्षा व्यवस्था नियंत्रणात असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारतीय सैन्याने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. या सर्जिकल स्टाइकमध्ये नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांच्या चौक्या उदध्वस्त करण्यात आल्या होत्या. तसेच बर्‍याच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते तसेच 2014 ते 2017 या तीन वर्षात तब्बल 368 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला मुळापासून संपवणार असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. सरकारने दहशतवादाविरोधात चांगले अभियान सुरू केले आहे.