चाळीसगाव – तालुक्यातील चांभार्डी येथील शेतात बाजरी कापत असताना विषारी साप चावल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी १.४५ वाजेपुर्वी घडली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, तालुक्यातील चांभार्डी शिवारातील शेतात बाजरी कापण्यासाठी १६ सप्टेंबर २०१८ रोजी चांभार्डी खुर्द येथील गोरख वामन वाघ (वय- ५५) हे मुलांसोबत गेले होते बाजरी कापत असतांना सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांना विषारी सर्प चावल्याने त्यांना चक्कर येवुन ते खाली पडले. त्यावेळी त्यांच्या मुलांनी त्यांना चाळीसगाव येथे रुग्णालयात आणले असता खाजगी रुग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरी वरुन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात अकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली असुन तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहेत.