सर्पदंश झाल्याने बालिकेचा मृत्यू

0
जळगाव – शेतातून काम करून घरी परतत असतांना एका दहा वर्षिय बालिकेला सर्पदंश झाल्याने उपचारापुर्वी या बाहिलकेचा वाटतच मृत्यू झाला असून जिल्हा सामान्य रूग्‍णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, बायडी श्रावण भील (वय-10) रा.साळसिंगी ता. बोदवड ही बालिका आपल्या आईसह दुसऱ्यांच्या शेतात हातमजूरीसाठी गेली होती. दुपारी शेतातून पायी घरी परतत असतांना बालिका सर्वांच्या पुढे चालत असतांना सापाने चावा घेतला. बालिका घाबरून आईकडे धावत धावत यवून मला काहीतरी चावले असे सांगितले. थोड्यावेळानंतर ती बेशुध्द झाली. तसेच तोंडातून फेस पडायला लागला. जखमी अवस्थेत बालिकेचे वडील श्रावण रमेश भिल यांनी मोटारसायकलने बोदवडच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र बालिकेचे प्रकृती अधिक खालावल्याने तेथील वैद्यकिय अधिकारी यांनी तातडीने जळगाव जाण्यासाठी रवाना केले. मात्र जिल्हा सामन्य रूग्णालयात दाखल केले असता बालिकेचा मृत्यू झाला होता. मयत बालिकेच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परीवार आहे. जिल्हा रूग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.