सर्पमित्र राजेश ठोंबरे यांना खान्देश भूषण पुरस्कार जाहीर!

0

चाळीसगाव- खान्देश मराठा पाटील मंडळ मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा खान्देश भूषण पुरस्कार राज्यातील चार जणांना जाहीर झाला असून त्यात खान्देशातून एकमेव सर्पमित्र तथा राज्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ६ जानेवारी रोजी बदलापूर येथील एका विशेष समारंभात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी मुंबईच्या खान्देश मराठा पाटील मंडळ संस्थापक बाळासाहेब मोहने यांच्या उपस्थितीत भिवंडीचे खासदार कपिल पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, आमदार निरंजन डावखरे,आमदार बालाजी किणीकर, सीमाताई हिरे,माजी आमदार शरद पाटील, कुलाबा-बदलापूर नगराध्यक्ष विजयाताई राऊत, उपनगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, मंडळाचे सचिव विश्वनाथ पाटील, कार्याध्यक्ष अशोक पाटील, प्रदीप पवार, शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

खान्देश भूषण पुरस्काराचे चौघे मानकरी
खान्देश मराठा पाटील मंडळ मुंबई यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा खान्देश भूषण पुरस्कार यंदा मुंबईचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे, ठाण्याचे सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार , किरण सोनवणे यांच्यासह खान्देश भूषण सर्पतज्ञ राजेश ठोंबरे यांना जाहीर झाला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नगरसेवक सर्वश्री शैलेश वडनेरे संभाजी शिंदे, रवींद्र पाटील, दादासाहेब पाटील, माधव पाटील, मुरलीधर पवार यांच्यासह कार्यकारणीच्या युवा आघाडीचे सदस्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. येत्या सहा जानेवारी रोजी गायत्री गार्डन बदलापूर येथे खानदेश मराठा पाटील मंडळाच्या 15 व्या वार्षिक स्नेहसंमेलनात हा पुरस्कार दिला जाणार आहे हा पुरस्कार मिळाल्याने राजेश ठोंबरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.