एरंडोल – शेतात शेतीचे काम करीत असतांना विषारी सापाने दंश केल्याने ४७ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच मृत्यु झाला.हि घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास आडगाव (ता.एरंडोल) येथे घडली. आडगाव येथील शेतकरी कैलास हरी महाजन (वय ४७) हे दुपारी तिन वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात पिकांच्या अंतरमशागतीचे काम करीत असतांना त्यांच्या पायास विषारी सर्पाने दंश केला. पायाला दंश केल्याचे शेतकरी कैलास महाजन यांच्या लक्षात आल्यामुळे ते स्वतः मोटर सायकल चालवत शेतातुन गावात आले व त्यांनी मुलाला घेऊन कासोदा येथील आरोग्य उपकेंद्रात आले.मात्र उपकेंद्रात लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्वरित रुग्णवाहिकेतून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यु झाला.मयत कैलास महाजन यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. याबाबत कासोदा पोलीस स्थानकात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.