सर्वघटकांचा विकास साधणे हेच अधिकार्‍यांचे ध्येय

0

रावेर। शासकीय सेवेत रुजू होतांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून तळागाळातील घटकांचा विकास साधणे हेच अधिकारी व कर्मचार्‍यांचे ध्येय असले पाहिजे. यानुसार काम केल्यामुळे तसेच ग्रामीण व शहरी जनतेची उत्कृष्ट सेवा केल्याची पावती यावलचे तहसीलदार कुंदन हिरे व बाकी महसूल कर्मचार्‍यांना मिळाली असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी केली. येथील कृषी उपन्न बाजार समितीतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडुन मिळालेल्या पुरस्कारार्थीचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले सी.एच. पाटील, पी.डी. आळे, शिवकुमार लोळपे, विठोबा पाटील, एस.एस. तड़वी, आदी कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती डॉ.राजेंद्र पाटील, उपसभापती प्रमोद धनके, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, पितांबर पाटील, डी.सी. पाटील, गोपाळ नेमाडे, अरुण पाटील, नीळकंठ चौधरी, गोंडु महाजन, कृष्णराज पाटील, कल्पना पाटील, उस्मान तड़वी, सचिव गोपाळ महाजन आदींची उपस्थिती होती.

पूर्वी रावेर आणि आता यावल तालुक्यात शेतकरी व गरीब जनतेसाठी केलेल्या कामांची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन पुरस्कार जाहिर केला. महसूल विभागाने प्रत्येकवेळी बाजार समितीला सहकार्य केलेले आहे त्यामुळेच संचालक मंडळाने तहसीलदारसह सर्व कर्मचार्‍यांचा सत्कार केला.
डॉ. राजेंद्र पाटील,
सभापती बाजार समिती, रावेर