जळगाव । सर्वधर्मीय सामुहीक विवाह सोहळा समितीतर्फे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे महाराष्ट्र राज्य व जळगाव धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संकल्पनेतुन आत्महत्या ग्रस्त शेतकरी, शेतमजुर, आर्थिक दुर्बल घटक, आदिवासी बांधव आदी समाज व धर्मातील लोकांचा आर्थिक बोझा कमी करण्याच्या उद्देशाने ठरलेल्या विवाहांचे एकत्रित समुह पद्धतीने सामुहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. सामुहिक सर्वधर्म विवाह सोहळा समिती व सावदा येथील आदिवासी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सावदा नगरपालीकेच्या शेजारील मैदानावर 13 मे रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
यांची राहणार उपस्थिती
या उपक्रमास जैन गृप अध्यक्ष अशोक जैन, ओंकारेश्वर देवस्थान जळगाव, एल के फाउंडेशन, सावदा येथील व्यंक्तीसंघटनांतर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. सोहळ्यास प्रमुख अतिथी एकनाथ खडसे, खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री सुरेशदादा जैन, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार शिरीष चौधरी, अरुणभाई गुजराथी, महापौर ललीत कोल्हे, अशोक जैन, धर्मदाय उपायुक्त जोशी, सहा.धर्मदाय आयुक्त चेतनकुमार तेलगावकर व डोले मॅडम, विश्वनाथ तायडे अदि मान्यवर कार्यक्रमास उपस्थीत राहणार आहेत. समितीच्या वतिने अध्यक्ष मुकुंद मेटकर, तालुका अध्यक्ष राजु तडवी, सहउपाध्यक्ष जुगल जोशी, सचिव युवराज वाघ, सहसचिव शिवाजी शिंपी, पंकज भावसार, धर्मराज पेचोरे, योगेश भावसार, मुकेश सोनवणे, प्रमोद नेवे, भालचंद्र भावसार, आर के चौधरी, बाळासाहेब बेहडे, महेश चौधरी, देविदास भावसार व कार्यकर्तेतर्फे नियोजन करण्यात येणार आहे.