चाळीसगाव । उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे बस स्थानकामागील गवळी वाड्यात गरीब महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी संक्रांतीच्या निमित्ताने उमंग समाजशिल्पी महिला परिवाराने समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. महिला परिवारातर्फे बस स्थानकामागील गवळी वाड्यात 65 हून अधिक महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून साड्या भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमाअंतर्गत सेंट जोसेफ स्कूलच्या टीचर ललिता पिंगळे यांनी प्राथमिक वर्गातील मुलांना दररोज 1 तास मोफत शिक्षण देण्याचे जाहीर केले. आधी करावे मग बोलावे या उक्तीप्रमाणे हा उपक्रम गेल्या महिन्यापासून चालू आहे. त्याचप्रमाणे डॉ. ज्योती पाटील यांनी दर शनिवार, रविवार संध्या. 5 ते 7 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत.
महिलांना दिली विविध योजनांची माहिती
यावेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यांनी महिलांशी संवाद साधताना शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास उमंग परिवार आपल्याला सहकार्य करेल, असे आश्वासन यावेळी संपदाताई पाटील यांनी उपस्थित महिलांना दिले. या कार्यक्रमात उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या सदस्या डॉ. ज्योती पाटील, प्रतिभा पाटील, ललिता पिंगळे, सुवर्णा राजपूत, ज्योती पाटील, रेखा जोशी, रत्नप्रभा नेरकर, मेनका जंगम, वैशाली पाटील, संगीता मराठे, सरला येवले, विजया पाटील, हेमा शर्मा, अर्चना निकुंभ, रुपाली शिंपी, माया सावंत, शैला राजपूत, मंगला कुमावत, कल्पना शुक्ल, साधना पाटील उपस्थित होत्या.